व्याख्याते प्रा.प्रदीप कदम
प्रा. प्रदीप कदम यांचा अल्पसा परिचय...
शिक्षण: MA., M.Ed., M.Phil., MBA., PhD
प्राचार्य: कॉनक्वेस्ट कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड कॉम्प्यूटर स्टडीज चिखली
( पिंपरी चिंचवड)
संस्थापक अध्यक्ष :मानवता प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य
विश्वस्त: संत तुकाराम महाराज पादुका स्थान ट्रस्ट, देहू
कार्याध्यक्ष: आधार प्रतिष्ठान, पुणे
प्रा. प्रदीप कदम हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते आहेत. त्यांची अनेक विषयांवर
महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर २००० हून अधिक व्याख्याने झाली आहेत.
वक्तृत्व हा काही शब्दांचा खेळ नसतो, तो विचारांचा उत्सव असतो, वक्ता समाज बांधत निघालेला असतो याची प्रचिती त्यांच्याकडे बघितले की येते . समाज बांधत निघालेले प्रदीप कदम हे महाराष्ट्रभर प्रबोधन करत आहेत. उत्तम वक्ते तसेच उत्तम लेखक अशीही त्यांची ख्याती आहे, आठवणितील विद्यार्थी, वेदांत- श्री ( पुणे) अंकासाठी त्यांनी विशेष लेखन केले आहे . प्रा. प्रदीप कदम हे उत्तम कवी म्हणूनही नजरेसमोर येतात रानवेली या ऑडिओ सीडीसाठी तसेच शब्दगंध साहित्यिक चळवळी साठी त्यांनी केलेले काव्यलेखन हे त्याचीच साक्ष देते.
यु ट्यूब , इंस्टाग्राम, फेसबुक वर रोज प्रेरणादायी व्हिडिओ तर youtube वर प्रदीप कदम चॅनेल द्वारे शेकडो ऐतिहासिक आणि मोटिवेशनल व्हिडिओ आहेत.. आपण ते पाहू शकता...
॥ प्रा. प्रदीप कदम यांना मिळालेले पुरस्कार ॥
शांतिदूत सेवा परिवाराचा 2025 चा शांतिदूत सेवारत्न पुरस्कार
वीरभारती पुरस्कार २०१५ ( आंतरभारती संस्था,अहमदनगर)
स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय संस्काररत्न पुरस्कार
श्रीसाई संकल्प कार्यगौरव पुरस्कार ( साई फाऊंडेशन, मावळ)
राजा छञपती साहित्य आभियान पुणे संस्थेचा कार्यगौरव पुरस्कार
बंधुता साहित्य परिषदेचा २०23 चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते प्रदान.
विश्वसखा ट्रस्ट, मुंबईचा २०१७ चा नॅशनल प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार.
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, संस्थेचा सह्याद्री गौरव पुरस्कार.
यांसारख्या अनेक पुरस्काराने प्रदीप कदम सर सन्मानित आहेत.
डिसेंबर २०२० च्या बंधुता साहित्य परिषदेच्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्थान भूषवले आहे.
१२ मार्च २०२२ रोजी शेगाव येथे झालेल्या कलादर्पन साहित्य संघाच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे.
13 एप्रिल 2023 च्या वाघोली येथील 13 व्या धर्म मैत्री विचारवेध संमेलनाचे अध्यक्ष स्थान भूषवले आहे.
2022-23 शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र शासन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था (DIET) द्वारे शिक्षकांसाठी मार्गदर्शन म्हणून उपक्रमात ई-बालभारती मध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून व्हिडिओ द्वारे त्यांची मुलाखत प्रसारित झाली आहे.